उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग; ‘व्हिलेज लाईफ’ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन ..
उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग; ‘व्हिलेज लाईफ’ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन ... चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे. पुणे : चित्रप्रदर्शनाद्वारे ग्रामीण जीवनाचे दर्शन आज पुणेकरांना घडले. ग्रीष्म ऋतूत लालबुंद फुलांनी बहरलेला गुलमोहोर... वसंत ऋतूमध्ये विविध रंगांनी नटलेला निसर्ग... कौलारू घराच्या अंगणात बागडणाऱ्या कोंबड्या... सोनेरी रंगाची उधळण करणारी खेड्यातील रम्य सायंकाळ या चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे. या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रद...