शिक्षण क्षेत्रासाठी 'दिवाळी'...
पुणे - केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा शिक्षण क्षेत्रासाठी "दिवाळी' आहे. या क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतुदीमुळे संशोधन आणि गुणवत्ता विकासाला मोठे पाठबळ मिळेल, अशा शब्दांत शिक्षण तज्ज्ञांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) : शिक्षणासाठी अर्थसंकल्पात केलेली भरीव तरतूद या क्षेत्राला नवी दिशा देईल. तरुण संशोधक विद्यार्थ्यांचाही विचार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी पाठ्यवृत्ती ही संशोधनाला चालना देणारी ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. एस. के. जैन (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी) : वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्या वाढणार असल्याने डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होईल; तसेच शिक्षण संस्थांना देणगी देणाऱ्यांना 80-जीची सवलत मिळते; पण ती कमी आहे, त्यात मोठी वाढ केल्यास देणगीदारांची संख्या वाढेल आणि संस्थांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस) : शिक्षणाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आश्वासक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी एकात्मिक...